नवी मुंबई : नवी मुंबईत वाढत्या डेेंग्यूच्या आजारामुळे एकीकडे नवी मुंबईकर त्रस्त झालेले असतानाच प्रभाग 98च्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका व उद्यान शहर सुशोभीकरण समितीच्या सभापती अॅड. सौ. सपना गावडे-गायकवाड यांनी आपल्या प्रभागातील रहीवाशांकरता रविवार, दि. 16 ऑगस्ट रोजी मोफत डेंग्यू तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.
प्रभाग 98 मधील नेरूळ सेक्टर 28मधील श्री गणेश सोसायटीमधील श्रीगणेश मंदीराजवळ या आरोग्य शिबिराचे महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून नगरसेविका अॅड. सपना गावडे-गायकवाड यांनी आयोजन केले आहे. सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत हे शिबिर आयोजित करण्यात आले असून या शिबिरामध्ये डेंग्यू आजाराची तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. डेंग्यूबाबतची तपासणी आणि डेंग्यू या साथीच्या आजाराबाबत असणारे समज-गैरसमज दूर करण्यासाठी विभागातील रहीवाशांनी मोठ्या संख्येने या शिबिरामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन शिबिराच्या आयोजक नगरसेविका अॅड. सपना गावडे-गायकवाड यांनी केले आहे.