संजय बोरकर : ९८६९९६६६१४
नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या जुईनगरमधील प्रभाग ८३च्या नगरसेविका सौ. तनुजा श्रीधर मढवी यांनी आयोजित केलेल्या चारदिवसीय शिबिराच्या पहिल्या दिवशीच स्थानिक रहीवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून नगरसेविका सौ. तनुजा मढवी यांनी १६ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट या कालावधीत चार दिवसीय आधार कार्ड शिबिराचे आयोजन स्थानिक रहीवाशांकरता केले आहे. जुईनगर सेक्टर २३ मधील पंचवटी सोसायटीमधील तळमजल्यावर हे आधार कार्ड शिबिर आयोजित केले असून रविवारी सकाळी सामाजिक कार्यकर्ते श्रीधर मढवी यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी राष्ट्रवादी कॉंगेे्रसचे जुईनगरमधील युवा नेेते जयेश मढवी यांच्यासह स्थानिक रहीवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.