संजय बोरकर : ९८६९९६६६१४
नवी मुंबई : नवी मुंबईत वाढत्या डेेंग्यूच्या आजारामुळे एकीकडे नवी मुंबईकर त्रस्त झालेले असतानाच प्रभाग ९८च्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका व उद्यान शहर सुशोभीकरण समितीच्या सभापती ऍड. सौ. सपना गावडे-गायकवाड यांनी आपल्या प्रभागातील रहीवाशांकरता रविवार, दि. १६ ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या मोफत डेंग्यू तपासणी शिबिरास स्थानिक रहीवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. १५०हून अधिक रहीवाशी या शिबिरात सहभागी झाले होते.
प्रभाग ९८ मधील नेरूळ सेक्टर २८मधील श्री गणेश सोसायटीमधील श्रीगणेश मंदीराजवळ या आरोग्य शिबिराचे महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून नगरसेविका ऍड. सपना गावडे-गायकवाड यांनी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत आयोजन केले होते. या शिबिरामध्ये डेंग्यू आजाराची तपासणी व मार्गदर्शन याबाबत नेरूळ नागरी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांकडून रहीवाशांना विस्तृत माहिती देण्यात आली. शिबिरात सहभागी झालेल्यांची रक्ततपासणी करण्यात आली.
डेंग्यूबाबतची तपासणी आणि डेंग्यू या साथीच्या आजाराबाबत असणारे समज-गैरसमज दूर करण्यासाठी याकरता हे शिबिर आयोजित करण्यात आले होते व काही अंशी आपला शिबिर आयोजनाचा उद्देश सफल झाला असल्याची माहिती शिबिराच्या आयोजक उद्यान शहर सुशोभीकरण समितीच्या सभापती व स्थानिक नगरसेविका ऍड. सपना गावडे-गायकवाड यांनी दिली. या शिबिरात महापालिकेचे माजी उपमहापौर व नगरसेवक अशोक गावडे आणि माजी नगरसेविका सौ. निर्मला गावडे यांच्यासह स्थानिक रहीवाशी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.