नवी मुंबई : गेल्या काही दिवसापासून नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये सर्वपक्षीय राजकारण्यांची पाऊले वळू लागली आहेत. ते कोणाला सोडविण्यासाठी जात नाहीत तर चक्क पोलीसांचे अभिनंदन करण्यासाठी सातत्याने येवू लागली आहेत.
नेरूळ पोलीसांनी उत्तर प्रदेशातील आग्रा येथील काश्मिरी बाजार परिसरात धडक देवून अपहरण केलेल्या 21 मुलींची सुटका केली. या अभिमानास्पद व भूषणावह कामगिरीबाबत प्रभाग 87 च्या शिवसेना नगरसेविका व विधी समिती सदस्या सौ. सुनिता रतन मांडवे आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक रतन नामदेव मांडवे यांनी नुकतेच नेरूळ पोलीस ठाण्यात जावून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता शिंदे-अल्फान्सिसो यांची भेट घेवून त्यांचे अभिनंदन केले. तर दुसर्या छायाचित्रात महापालिका निवडणूकीत शिवसेनेचा अभेद्य गडाला खिंडार पाडून नेरूळच्या राजकारणात जायंट किलर ठरलेल्या प्रभाग 96च्या नगरसेविका सौ. रूपाली किसमत भगत व त्यांचे सहकारी नेरूळ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता शिंदे-अल्फान्सिसो यांचे अभिनंदन करताना दिसत आहेत.