*** खासदार राजन विचारे यांचा रेल्वे महाव्यवस्थापक यांना सवाल ?
ठाणे : मागील झालेल्या भेटी नंतर खासदार राजन विचारे यांनी त्याच्या लोकसभा क्षेत्रातील ठाणे, नवी मुंबई मधील रेल्वे स्थानकातील प्रलंबित कामाचा आढावा घेण्यासाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक एस के सूद यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली त्यावेळी नगरसेवक गिरीश राजे, सचिव विनीत कुमार उपस्थित होते.
या चर्चेत सर्व प्रथम ठाणे रेल्वेच्या हद्दीत असणार्या जागेत फेरीवाल्यांनी जो काही हैदोस घातला आहे, तो कधी थांबणार? हे फेरीवाले एफ ओ बी व स्कायवाक वर ऐन गर्दीच्या वेळी आपले बस्तान मांडून बसलेले असतात, त्यांच्या शेजारी आर पी एफ आणि रेल्वे पोलीस चा अधिकारी त्यांना संरक्षण देत असतो. या 6 मिटर रुंदी असलेल्या पादचारी पूलावर 3 मीटर फेरीवाल्याचे बस्तान व त्यापुढे ग्राहकाची गर्दी त्यामुळे उरलेल्या 2 मीटर जागा प्रवाशांसाठी शिल्लक राहते तर प्रश्न पडतो की हा पादचारी पूल रेल्वे प्रवाशासाठी का फेरीवाल्यांसाठी ? या गंभीर प्रश्नाबाबत खासदार राजन विचारे यांनी एस के सूद यांना तातडीने दखल घेवून त्याठिकाणी जबाबदार अधिकारी नेमावा, अशा सूचना देण्यात आल्या. जर ही कार्यवाही झाली नाही तर शिवसेना स्टाईलने हे फेरीवाले हटविण्यात येईल असे सूद यांना खा. राजन विचारे यांनी ठणकावले.
त्यानंतर प्लॅटफॉर्मवर काही ठिकाणी छपरांवरून पाण्याची गळती सुरु असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो त्यामुळे स्थानकावर जिकडे तिकडे दुर्गंधी पसरलेली असते तसेच सर्व प्लॅटफॉर्मवर महिलांसाठी स्वतंत्र शौचालय उभारणार या केलेल्या घोषणेचे विचारणा केली असता, त्यावर सूद यांनी सर्वेक्षणाचे काम सुरु असल्याचे सांगण्यात येऊन लवकरच या कामाला सुरुवात होईल असे आश्वासन दिले.
तसेच नवी मुंबईतील सिडकोने विकसित केलेल्या रेल्वे स्थानकांची डागडुजी व्यवस्थित न झाल्याने या रेल्वे स्थानकांच्या होत असलेल्या दुरावस्थेबाबत विचारणा केली असता रेल्वे व सिडको यांच्या रेल्वे स्थानका मधील हस्तांतरित करण्याच्या करारावर उच्चस्तरीय मिटिंग आपल्या उपस्थित आयोजित करण्यात येईल असे एस के सूद यांनी खा.राजन विचारे यांना सांगितले व कळवा एरोली या मंजूर झालेल्या नवीन एलीवेटड मार्गच्या व नवीन सीवूड रेल्वे स्थानक व उरण पर्यंत होणार्या स्थानाकांच्या कामांनाही गती द्या असे राजन विचारे यांनी सुचविले.
** ठाणे-मुलूंड दरम्यानच्या नवीन रेल्वे स्थानकाचा डिपीआर (डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट) आठवड्याभरात सादर होणार
ठाण्याचे खासदार राजन विचारे यानी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात शून्य प्रहर चर्चेच्या वेळी ठाणे व मुलूंड दरम्यान नवीन उन्नत (एलिव्हेटेड) रेल्वे स्थानकाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर या रेल्वे स्थानकाच्या कामाचा डिपीआर बनविण्याच्या कामाला आता सुरूवात झाली असून पुढील आठ-दहा दिवसात डिपीआर केला जाईल असे आश्वासन मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक एस. के. सूद यानी खासदार राजन विचारे याना दिले. पावसाळी अधिवेशनाच्या समाप्तीनंतर मुंबईत परतल्यावर खासदार राजन विचारे यांनी लगेच एस. के. सूद यांची भेट घेऊन रेल्वे संदर्भातील प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा केली.