सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : नागपंचमी सणाचे औचित्य साधून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून नेरूळ सेक्टर दहामध्ये १९ ऑगस्ट रोजी नागपंचमी उत्सव-२०१५चे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष प्रभाग ९४च्या वतीने महिला बचत गट आयोजित या नागपंचमी उत्सवचे नेरूळ सेक्टर १० येथे पंचपरमेश्वर मंदीराजवळ या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाची माहिती देताना समाजसेवक राजेश भोर यांनी सांगितले की, नागपंचमी उत्सव २०१५ मध्ये आरोग्य शिबिर, पारंपारिक नृत्य गीतांचा कार्यक्रम याचा समावेश आहे.
नेरूळ सेक्टर १० मधील दत्तदिप क्लासेसजवळ सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. सांयकाळी ४ ते ७ या वेळेत पारंपारिक नृत्यगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सांयकाळी ७ नंतर पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महिलांकरता या कार्यक्रमात भव्य स्वरूपामध्ये फुगड्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या स्थानिक वार्ड अध्यक्षा सौ. वैशाली राजेश भोर या कार्यक्रमाच्या आयोजक आहेत. विजेत्या महिलांना पैठणी दिली जाणार आहे.
शहरी भागात आपली संस्कृती, आपले सण-उत्सव जपण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले असून नेरूळ नोडमधील महिलांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येेने सहभागी व्हावे असे आवाहन समाजसेवक राजेश भोर यांनी केले आहे.