ठाणे : राज्यात दुष्काळी स्थिती असल्यामुळे राष्ट्रावादी कॉंग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या ‘संघर्ष’ची बहुचर्चित दहीहंडी रद्द केली आहे. ऑगस्ट महिना उजाडला तरी अजून राज्यात समाधानकारक पाऊस आलेला नाही. त्यामुळे यंदाची दहीहंडी आयोजित न करण्याचा निर्णय घेतला आहे.
आव्हाडांची दंहीहंडी मुंबईत अतिशय लोकप्रिय आहे. मोठमोठ्या बक्षिसांची दहिहंडी म्हणून याकडे बघितले जाते. त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे. दहिहंडीच्या वेळी पाण्याचा अपव्यय होतो. हाही या निमित्ताने वाचणार आहे.
भाजपचे आमदार राम कदमही दहिहंडी रद्द करण्याचा विचारात आहेत. दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी गेल्याच वर्षी अतिशय साधेपणाने दहिहंडी उत्सव आयोजित केला होता.