सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : सिवूड्स सेक्टर 48 येथील शिवसेना शाखेमध्ये एलईडी केंद्राचा शनिवार, दि. 22 जुलै रोजी प्रारंभ होत असून या कार्यक्रमाचे उद्घाटन महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या हस्ते होत आहे.
सकाळी 11 वाजता होणार्या या उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून शिवसेना शहरप्रमुख विजय माने आणि बेलापुर विधानसभा संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे उपस्थित राहणार आहेत.
घर-घरात प्रकाश, घर-घरात बचत या ध्येयपूर्तीकरता केंद्र शासनाच्या डी.एल.पी.ए या योजनेतंर्गत खासदार राजन विचारे यांच्या सहकार्याने एल.ई.डी.बल्ब वाटप केंद्राचे उद्घाटन होत असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक शाखाप्रमुख विशाल विचारे यांनी दिली.
या योजनेतंर्गत सर्व वीजग्राहकांना 7 वॅट एल.ई.डी बल्बचे वितरण केले जाणार असून योजनेत सहभागी होवू ईच्छिणार्यांनी आपले वीज बिल व आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. सिवूड्सवासियांनी मोठ्या संख्येने या केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन शाखाप्रमुख विशाल विचारे यांनी केले आहे.