दुबई : भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. तर एकदिवसीय क्रमवारीत भारताने दुसरे स्थान राखले आहे.
कोहलीव्यतिरिक्त एकदिवसीय क्रमवारीत शिखऱ धवन आणि एकदिवसीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीदेखील आहेत. शिखर या क्रमवारीत सातव्या तर धोनी नवव्या स्थानी आहे. या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा एबीडे विलियर्स अव्वल स्थानी कायम आहे.
एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल दहामध्ये भारताचा रविचंद्रन अश्विन एकमेव भारतीय गोलंदाज आहे. ऑस्ट्रेलिया मिशेल स्टार्क पहिल्या स्थानी आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा इम्रान ताहिर या क्रमवारीत दुसर्या स्थानावर आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत १-२ ने विजय मिळवल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या क्रमवारीत सुधारणा झाली असून संघाने तिसरे स्थान मिळवले आहे. दक्षिण आफ्रिका ११० रेटिंगसह तिसर्या तर न्यूझीलंड १०९ रेटिंगसह चौथ्या स्थानी आहे.