*** गणेश पोखरकर **
कल्याण : भाजपा प्रदेश सचिव तथा कल्याण भाजपा जिल्हा अध्यक्ष आमदार नरेंद्र पवार यांचा गुरुवार, दि. 27 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साही वातावरणात अनेक सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्यात आला. यामध्ये भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कल्याण शहरात अनेक ठिकाणी मोफत वैद्यकीय शिबीरे, रक्तदान शिबीर, अन्नदान, आधारकार्ड वितरण शिबीर, नोकरी मेळावा आदी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांना कल्याणकरांनी उस्फुर्त प्रतिसाद देत आमदार नरेंद्र पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे विशेष म्हणजे कल्याण स्पोर्टस क्लब येथे आयोजित केलेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात उपस्थितांनी आमदार पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत वाढदिवसाची भेटवस्तू न देता धनादेश आणि रोख स्वरूपात महाराष्ट्र शासनाच्या शेतकर्यांसाठी महत्वाकांक्षी असलेल्या जलयुक्त शिवार योजनेला सुमारे 5 लक्ष रुपयांचा निधी सुफुर्त केला.
विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून जनतेशी नाळ जोडलेल्या आमदार नरेंद्र पवारांचा वाढदिवस भाजपा कार्यकर्त्यांनी आपल्या आपल्या विभागात अनके सामाजिक उपक्रमातून साजरा केला. आमदार पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बैलबाजार येथे सरोदे मॉलमध्ये भाजपाचे पदाधिकारी प्रताप कुलकर्णीं यांनी नोकरी मेळाव्याचे आयोजन केले आले होते. या नोकरी मेळाव्यासाठी सहकार आणि औद्योगिक क्षेत्रातील तब्बल 21 कंपन्या उपस्थित होत्या. या नोकरी मेळाव्यात सुमारे 800 युवक – युवतींना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. या नोकरी मेळाव्याचे उद्घाटन आमदार नरेंद्र पवारांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते राजाभाऊ पातकर, देवानंद भोईर, युवामोर्चा अध्यक्ष गौरव गुजर, भाजपा शहर उपाध्यक्ष रितेश फडके आदी कार्यकर्ते उपस्थित होते. त्याचप्रमाणे याच निमित्ताने खडकपाडा परिसरात रवी गायकर यांच्या माध्यमातून शासन विमा योजना उपक्रम आणि रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये देखील नागरीकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला. कल्याण जिल्हा भाजपच्या महिला आघाडी अध्यक्ष संजीवनी पाटील यांनी फडके मैदान परिसरात आधारकार्ड वितरण शिबिराचे आयोजान केले होते. या शिबिराचा अनेक नागरीकांना फायदा झाला. कल्याण इंदिरानगर परिसरात भाजपा जिल्हा उपाध्यक्षा अंजू अरोरा यांनी आमदार पवार यांच्या वाढदिवसा निमित्त मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन केले होते. त्याचबरोबर जिल्हा युवती अध्यक्षा कांचन खरे यांनी गांधी चौक परिसरात पंडितवाडी येथे नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन केले होते. कल्याण रेल्वे स्थानक परिसरात आमदार पवार यांच्या हस्ते भाजपा प्रणीत शेअर रिक्षा स्टडचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी रिक्षा चालकांचे पंतप्रधान जनधन विमा योजनाच्या माध्यमातून विमा काढण्यात आले.
दरम्यान आमदार नरेंद्र पवार यांनी वाढदिवसा निमित्त कोणतीही भेटवस्तू न देता महाराष्ट्र शासनाच्या महत्वकांक्षी जलयुक्त शिवार योजनेसाठी मदत निधी देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरीकांनी आमदार पवार यांच्याकडे धनादेश आणि रोख रक्कमेच्या स्वरुपात तब्बल एकूण 5 लक्ष रुपयांचा निधी सुफुर्त केला. हा विशेष निधी आमदार नरेंद्र पवार स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देणार आहेत.