अनंतकुमार गवई
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या क्रीडा अधिकारी श्रीमती अभिलाषा म्हात्रे यांना राष्ट्रीय मानाचा अर्जुन पुरस्कार नवी दिल्लीत प्रदान
नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या क्रीडा अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय महिला कबड्डीपटू श्रीमती अभिलाषा म्हात्रे यांना केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या वतीने आज राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून क्रीडा क्षेत्रातील मानाचा अर्जुन पुरस्कार भारत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
श्रीमती अभिलाषा म्हात्रे यांनी सन 2012 च्या महिला विश्वचषक स्पर्धेत तसेच 2014 च्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या भारतीय महिला कबड्डी संघात उत्तम खेळ करीत भारत देशाचे प्रतिनिधित्व केले होते.
या राष्ट्रीय सन्मानाबद्दल नवी मुंबईकर नागरिकांच्या वतीने क्रीडा अधिकारी श्रीमती अभिलाषा म्हात्रे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.