नवी दिल्ली : नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या वसतिगृहात एका 18 वर्षीय विद्यार्थीनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी घडली. ही विद्यार्थीनी बिकानेरला राहणारी होती. एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला ती शिकत होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थीनीकडून कोणतीही चिठ्ठी मिळालेली नाही. पोलिसांनी मतृदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यीनीची मोबाईलही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
खुशबू असे या विद्यार्थीनीचे नाव आहे. याच वर्षी तिने एमबीबीएससाठी प्रवेश घेतला होता. शनिवारी संध्याकाळी खुशबू तिच्या मैत्रिणीसह खरेदीला गेली होती असे तिच्या मैत्रिणींना माहिती दिली.
दरम्यान, एम्स प्रशासनाने या प्रकऱणाची गंभीर दखल घेत तपास सुरु केला आहे. रॅगिंगमुळे खुशबूने आत्महत्येचे पाऊल उचलले नसावे ना याचाही शोध घेतला जात आहे.