मुंबई : वादग्रस्त स्वयंघोषित धर्मगुरू राधे मॉं नेहमी वादात असलेला रिऍलिटी शो ‘बिग बॉस’च्या सिझन ९ मध्ये दिसण्याची शक्यता आहे. एका प्रसिद्ध न्यूज वेबसाइटनं दिलेल्या बातमीनुसार, बिग बॉस मेकर्सने स्पर्धक निवडण्याचं काम सुरू केलंय.
यासंदर्भात राधे मॉंचीही त्यांनी बेट घेतलीय. सर्व काही ठीक असलं तर राधे मॉं यंदा बिग बॉसच्या घरात दिसू शकेल.
राधे मॉंचा मिनी स्कर्टवाला फोटो वायरल झाल्यानंतर आणखी वाद झाला. हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी एका महिलेनं राधे मॉं विरुद्ध तक्रार केलीय.
तसंच काही दिवसांपूर्वी पहिले राधे मॉंची भक्त असलेली आणि आता राधे मॉंच्या विरोधात असलेली टिव्ही अभिनेत्री डॉली बिंद्रानं राधे मॉं लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. डॉली बिंद्राही यापूर्वी बिग बॉसची स्पर्धक राहिलीय. आपल्याला सतत जीवे मारण्याची धमकी येत असल्याचा आरोप डॉली बिंद्रानं लावलाय.
मनोरंजन क्षेत्रामध्ये राधे मॉंचे अनेक फॉलोअर्स आहेत. त्यातील काही आता वादानंतर राधे मॉंपासून दूर झाले आहेत. डॉली बिंद्रा, दिव्यंका त्रिपाठी, मनोज तिवारी, प्रल्हाद कक्कड, सुभाष घई आणि गजेंद्र चौहान यांच्यासोबत राधे मॉंचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच वायरलही झाले आहेत.