** कुरार गाव येथील मोफत आधार कार्ड केंद्राचे आमदार सुनिल प्रभु यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : आधार कार्ड हा आता नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा मोठा आधार झाला आहे. अनेक दिंडोशीवासीय आज आधारकार्ड पासून वंचीत आहे.दिंडोशी विधानसभा मतदारसंघातील आधारकार्ड पासून वंचीत असलेल्या नागरिकांसाठी येथील स्थानिक आमदार विभागप्रमुख सुनिल प्रभू आणि अनुराग ग्रुपचे रणवीर चौहान यांच्या सहकार्याने मोफत आधार कार्ड नोदणी केंद्र आज पासून सुरु करण्यात आले आहे.आहेत. रोज सुमारे ५०-६० नागरिकांना याठिकाणी आधार कार्ड देण्याची व्यवस्था येथे करण्यात आली असून किमान वर्षभ याठिकाणी आधार कार्ड केंद्र सुरू राहणार असल्याची माहिती उपविभागप्रमुख विष्णू सावंत यांनी दिली.
सकाळी आमदार सुनिल प्रभु यांच्या हस्ते या मोफत आधार कार्ड केंद्राचे उद्घाटन झाले. या योजनेचा येथील जास्तीत जास्त नागरिकांनी आणि शालेय विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. मालाड(पूर्व), कुरार गांव येथील रेड्डी चाळ, अंधेर कंपाउंड, कोकणी पाडा, संतोषी माता मंदिर समोर सकाळी ९ ते ५ यावेळेत गरजू नागरिकांना मोफत आधार कार्ड मिळणार असल्याची माहिती उपविभागप्रमुख अँड. सुहास वाडकर यांनी दिली.
यावेळी उपविभागप्रमुख विष्णू सावंत व अँड. सुहास वाडकर,महिला उपविभागसंघटक रिना सुर्वे व पूजा चौहान,नगरसेवक प्रशांत कदम,सुनील गुजर,नगरसेविका सायली वरिसे व माजी नगरसेवक गणपत वरिसे,शाखाप्रमुख कृष्ण देसाई, प्रदीप निकम,प्रभाकर राणे,राजू घाग,महिला शाखासंघटक गितांजली घाडी, संजिवनी रावराणे, बांधकाम व्यवसायिक पोपटशेठ धनवट उपस्थित होते.