नवी मुंबई : राज ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण रोजगार स्वयंरोजगार सेनेचे अध्यक्ष सुनील बसाखेत्रे यांनी बुधवार, दि. २ सप्टेंबर रोजी नवी मुंबईतील नियुक्त्या या जाहीर करण्यात आल्या. मनसे रोजगार स्वयंरोजगार विभागाच्या नवी मुंबई शहर संघटक पदी नितीन चव्हाण तर शहर सचिव पदी आप्पासाहेब कोठुळे यांची नियुक्ती करण्यात आली. बेलापूर उपशहर संघटकपदी स्वप्निल गाडगे तसेच ऐरोली उपशहर संघटकपदी रुपेश कदम यांना पदभार देण्यात आला. तर बेलापूर विभागात अनिकेत पाटील वाशी , विशाल शर्मा -सानपाडा जुईनगर , तुषार कचरे नेरूळ , प्रकाश गुंजाळ सीवूड , अमोल मापारी बेलापूर , प्रेम जाधव तुर्भे यांची विभाग संघटक पदी निवड करण्यात आली आहे . ऐरोली विभागात अजय मुंडे घणसोली , नीरज सिंग कोपर खैरणे , अक्षय सावंत ऐरोली आणि मनोज क्षिरसागर- रबाले यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत .
यावेळी रोजगार स्वयंरोजगारचे महाराष्ट्र अध्यक्ष सुनील बसाखेत्रे यांच्या सोबत प्रदेश चिटणीस महेंद्र बैसाणे , मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या सोबत नवी मुंबईतील पदाधिकारी उपस्थित होते.