मुंबई : शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या इंद्राणी मुखर्जीने अखेर आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अटक झाल्यानंतरही शीना जिवंत असून ती अमेरिकेत असल्याचा दावा करणार्या इंद्राणीने गुन्ह्यातील आपल्या सहभागाची कबुली दिली आहे. सोमवारी बांद्रा न्यायालायत आपल्या मुलीला विधीला भेटल्यानंतर इंद्राणीला रडू कोसळले होते.
न्यायालयात विधी आणि आपल्या वकिलांना भेटल्यानंतर इंद्राणीने गुन्हयाची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणातील अन्य दोन आरोपी संजीव खन्ना, श्यामवर राय यांनी गुन्ह्यातील आपला सहभाग कबुल केल्याचे इंद्राणीला विधीकडून समजले असावे.
संजीव खन्ना इंद्राणीचा माजी पती तर, श्यामवर राय माजी चालक आहे. दोघांनी इंद्राणीला शीनाच्या हत्येमध्ये मदत केली होती. मिखाईलच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप तिने फेटाळून लावला
तसेच शीनाच्या हत्येमागच्या उद्देशाचा अद्याप तिने खुलासा केलेला नाही. इंद्राणीने आपला गुन्हा कबूल केला असून आणखी तीन दिवस ती आमच्या कोठडीत आहे. या तीन दिवसात आम्ही तिला बोलते करण्याचा प्रयत्न करु असे अधिकार्यााने सांगितले.