मुंबई : मुंबई वगळता राज्यातल्या पेट्रोल पंपचालकांनी ७ सप्टेंबरला बंदचा इशारा दिला आहे. राज्यातील २५ महापालिकेतील पेट्रोल पंपचालकांकडून बंदचा इशारा देण्यात आला आहे.
महानगरपालिकेतील ङइढ रद्द करावा या मागणीसाठी पंप चालकांनी बंदची हाक दिली आहे. एलबीटी रद्द झाल्यास पेट्रोल डिझेल २ ते ५ रुपयांनी स्वस्त होणार असल्यानं त्याचा फायदा जनतेला होणार असल्याचं फामपेडानं म्हटले आहे. मात्र एलबीटी रद्द करण्याच्या आश्वासनापलीकडे सरकार दरबारी कोणतीही हालचाल होत नसल्यानं फामपेडानं बंदचा इशारा दिला आहे.
या बंदचा फटका पुढील दोन ते तीन दिवस बसण्याची शक्यता आहे. कारण संपूर्णपणे खरेदी विक्री बंद केली जाणार असल्याची माहिती फामफेडाचे अध्यक्ष उदय लोध यांनी दिली आहे. त्यामुळे या बंदमुळे सरकारचेही नुकसान होणार आहे. जर तोपर्यंत निर्णय सरकारने घेतला नाही तर पुढील आंदोलन तीव्र करू असा इशाराही त्यांनी दिलाय.