अनंतकुमार गवई
बेलापुर ः नेरुळ सेक्टर-१९ ए मध्ये नगरसेवक तथा ‘जनकल्याण मित्र मंडळ’चे संस्थापक-अध्यक्ष रविंद्र इथापे यांच्या जनकल्याण मित्र मंडळ तर्फे उद्या ६ सप्टेंबर २०१५ रोजी साजरा करण्यात येणार्या दहीकाला उत्सवात यावर्षी ११ लाख रुपयांची रोख बक्षीसे देण्यात येणार आहेत.
या दहीहंडीचे पुजन लोकनेते गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात येणार असून, यावेळी माजी खासदार डॉ. संजीव नाईक, आमदार संदीप नाईक, ‘नवी मुंबई’चे महापौर सुधाकर सोनवणे, नवी मुंबई महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, नवी मुंबई पोलीस आयुक्त प्रभात रंजन, उपमहापौर अविनाश लाड, महापालिका स्थायी सभापती सौ. नेत्रा शिर्के यांच्यासह सर्व नगरसेवक-नगरसेविका उपस्थित राहणार आहेत.
दहीहंडी उत्सवात प्रथम थर लावून हंडी फोडणार्या गोविंदा पथकास १,५१,०००/- रुपये आणि आकर्षक स्मृतीचिन्ह, मानाची हंडी फोडणार्या गोविंदा पथकास १,०१,०००/- रुपये आणि आकर्षक स्मृतिचिन्ह, द्वितीय पारितोषिक ५१,०००/-रुपये आणि सन्मानचिन्ह, महिला गोविंदा पथकांसाठी २५,०००/-रुपये आणि सन्मानचिन्ह तसेच नवी मुंबईतील आणि स्थानिक गोविंदा पथकासाठी ११,०००/- रुपये आणि सन्मानचिन्ह, सलामीसाठी ११११/- पासून ते ५५५५/- रुपयांपर्यंत थराप्रमाणे बक्षीसांची खैरात यावर्षी करण्यात येणार आहे, असे दइीहंडी उत्सव आयोजक रविंद्र इथापे यांनी सांगितले.
सहभाग घेऊ इच्छिणार्या गोविंदा पथकांनी नोंदणीसाठी आयोजक रविंद्र इथापे यांच्याशी ९८२०५५५०४४ या नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन ‘जनकल्याण मित्र मंडळ’तर्फे करण्यात आले आहे.