मुंबई : मोनो रेल्वेच्या कामासाठी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकातून शनिवारी रात्री १२.१० वाजता शेवटची लोकल सुटणार आहे. तर कर्जतला रवाना होणारी रात्रौ १२.३० ची लोकल छत्रपती शिवाजी टर्मिनसहून न सुटता ती दादर स्थानकातून १२.४८ वाजता रवाना करण्यात येणार आहे. या विशेष मेगाब्लॉकमुळे अनेक गाड्या रद्द केल्या असून काही गाडयांचा प्रवास अन्य स्थानकात खंडित करण्यात येणार आहे.
करी रोड स्थानकाजवळ मोनोरेलच्या दुसर्या टप्प्यातील पुलाच्या कामासाठी मध्य रेल्वेकडून शनिवारी आणि रविवारच्या मध्यरात्री १२.३० ते पहाटे ५.३० पर्यंत विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी रात्री १२.१० वाजताची कसारा लोकल ही मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकातून सुटणारी शेवटची लोकल असणार आहे.
या मेगाब्लॉकसाठी काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही लोकल गाडयांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. याशिवाय काही लांब पल्यांच्या गाड्याचा प्रवास देखील दादर स्थानकात रद्द करण्यात येणार आहे.
*** ५ सप्टेंबर रद्द करण्यात आलेल्या गाड्या ( सीएसटी स्थानकातून)
कल्याण- रात्री ९.२४
कुर्ला- रात्री ११.२५
कुर्ला- रात्री ११.३९
ठाणे- रात्री ११.५९
शिवाय कल्याण स्थानकातून रवाना होणारी रात्री ११.०५ वाजताची सीएसटी लोकल
*** ६ सप्टेंबर रद्द करण्यात आलेल्या गाड्या
सीएसटी स्थानकातून ठाणे- रात्री १२.२३
ठाणे स्थानकातून सीएसटी- पहाटे ४.०५, ४.३९, ५.०८, ५.३१ ची लोकल
कुर्ला स्थानकातून सीएसटी करीता रवाना होणारी पहाटे ५.५४ वाजताची लोकल
*** अंशत रद्द होणार्या गाड्या
१. सीएसटी कर्जत शेवटची लोकल दादरहून रात्री १२.४८ वाजता सुटेल
२. सीएसटीहून पहाटे सुटणार्या कर्जत ४.१२, खोपोली ४.२५, कर्जत ४.५०, कसारा ५.०२ या सर्व लोकल दादरहून रवाना होतील.
३. सीएसटी-आसनगाव लोकल कुर्लाहून पहाटे ५.१४ वाजता रवाना होईल.
४. सीएसटी-टिटवाळा लोकल पहाटे ५.३० आणि सकाळी ६.०४ कल्याण लोकल मुंब्रा स्थानकातून सुटतील.
५. ब्लॉक नंतर पहिली सीएसटी लोकल पहाटे ५.४८ वाजता सुटेल
६. शेवटची सीएसटी स्थानकात १२.२५ वाजता दाखल होईल.
७. खोपोली-सीएसटी रात्री ११.५९, कसारा-सीएसटी रात्री १.१४, बदलापूर-सीएसटी रात्री १.३९ या लोकल दादर स्थानकात रद्द करण्यात येतील.
८. पहाटे कर्जत-सीएसटी ४.५८, ठाणे-सीएसटी ५.१६, अंबरनाथ-सीएसटी ५.२६, टिटवाळा-सीएसटी ५.४४ या लोकल दादर स्थानकात खंडीत करण्यात येणार आहेत.
खंडित करण्यात येणार्या मेल एक्स्प्रेस गाड्या
१. चेन्नई-मुंबई मेल ३.२० वाजता दादर स्थानकात रद्द
२. भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस दादर येथे ३.३२ ऐवजी ५.३० वाजता येईल. पहाटे ५.५० वाजता सीएसटी स्थानकात दाखल होईल.
३. कन्याकुमारी-मुंबई एक्स्प्रेस दादर स्थानकात ५.४० वाजता खंडीत होईल.
४. साईनगर शिर्डी-मुंबई पॅसेंजर दादर स्थानकात ६.३० वाजता दाखल होईल.
५. सिकंदराबाद-मुंबई देवगिरी एक्स्प्रेस ७.१० वाजता दादर स्थानकात खंडित करण्यात येईल.
याशिवाय सीएसटी करता पहाटे ४.०५ ते ८.०५ या काळात येणार्या मेल एक्स्प्रेस कल्याण दिवा येथे खंडित करण्यात येतील. या गाडया सुमारे ३५ मिनिटे ते दोन तास उशिराने धावतील.
*** बदललेल्या गाड्यांचे वेळापत्रक
६ सप्टेंबर मांडवी एक्स्प्रेस सकाळी ७.१० ऐवजी सकाळी ८.०५ वाजता सुटेल.
उद्यान एक्स्प्रेस सकाळी ऐवजी सीएसटीहून सकाळी ९.०५ वाजता सुटेल.