ठाणे : थकीत रक्कम भरण्याबाबत नोटीस बजावूनही लक्ष न दिल्याने शहापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाला आज महसूल विभागाने टाळे ठोकले.
बाजार समिती संचालक कार्यालयासह मुख्य इमारतीतील २४ गाळ्यांना महसूल विभागाकडून सील ठोकण्यात आले आहे. बाजार समितीची ६० लाखांची रक्कम थकीत राहिल्यानं ही कारवाई करण्यात आली.
दुय्यम निबंधक कार्यालय तसेच भारत दूरसंचार निगम कार्यायाला या कारवाईतून वगण्यात आले आहे. विशेष म्हणजे बाजर समिती संचालक मंडळाला महसूल विभागानं शनिवारी याबाबत नोटीस दिली होती.
मात्र जुन्या संचालक मंडळाने बाजारातील व्यापार्यांना अंधारात ठेवलं. आज अचानक सर्व दुकानं सील केल्यानं व्यापारी वर्गाकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय. नुकतीच या बाजार समितीची निवडणूक पार पडली असून अद्याप नवी समिती स्थापन करण्यात आलेली नाही.