नवी मुंबई : नवी मुंबईचे शिल्पकार लोकनेते गणेश नाईक व माजी महापौर सागर नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी कॉंगे्रस पक्ष प्रभाग ८५ व ८६च्या वतीने परिसरातील नागरिकांकरता मोफत आधार कार्ड सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
१० सप्टेंबर ते १६ सप्टेंबर या कालावधीत कुकशेत गावातील महापालिका शाळेमध्ये सकाळी ९ ते सांयकाळी ६ या वेळेमध्ये आधार कार्ड सप्ताह राबविण्यात येणार असून महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सुरज पाटील हे या आधार कार्ड सप्ताहाचे आयोजक आहेत.
कुकशेत गाव, सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहा परिसरातील जे नागरिक, महिला, मुले-मुली आजही आधार कार्डपासून वंचित असतील त्यांनी या सप्ताहामध्ये आपले आधार कार्ड काढून घ्यावे असे आवाहन प्रभाग ८५च्या नगरसेविका सौ. सुजाता पाटील यांनी केले आहे.