मुंबई : पर्युषण काळात उघड्यावर मांसविक्री करणार्या मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
आजपासून जैन धर्मियांचा पर्युषण पर्व सुरू होतंय. त्यामुळे मुंबईतले कत्तलखाने चार दिवस बंद ठेवण्यात येतंय. शिवाय चार दिवस मुंबईत मांसविक्रीही बंद ठेवण्यात आलीय. या निर्णयाला मनसेचा तीव्र विरोध आहे.
पर्युषणाच्या काळात उघड्यावर मांसविक्री करून या निर्णयचा निषेध करण्यासाठी मनसेचे गटनेते संदीप देशपांडे दादरच्या मंडईबाहेर पोहचले. त्यांच्या बाजूलाच शिवसेनेनंही आपलं आंदोलन केलं.
कार्यकर्त्यांच्या या आंदोलनाविरोधात पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केल्यावर तिथे जोरात बाचाबाची झाली. त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलाय.