परभणी : जिल्ह्यातील काणेगाव शिवारात एक सहा ते सात फूट लांबीची मगर सापडली आहे, ही मगर नदीत किंवा एखाद्या तलावात नाही, तर चक्क शेतात सापडली आहे. दुष्काळामुळे माणसांचेही जीवन कठीण झालं आहे, मात्र मूके जलचरही नदी कोरडी पडल्याने, भक्ष्याच्या शोधात जमिनीवर येत आहेत.
काही शेतकर्यांना ही मगर शेतात दिसत होती, जेव्हा एका शेतकर्याने मगरीचे फोटो काढून आणले आणि वन खात्याच्या अधिकार्यांना दाखवले, तेव्हा ते खळबळून जागे झाले.
शेतकर्यांनी आणि वनखात्याने या मगरीला अखेरीस पाच तासानंतर दोरखंडात बांधलं आणि औरंगाबादला रवाना केलं. नद्यांमध्ये पाणीच नसल्याने ही मगर नदीबाहेर येऊन शेतात फिरत असल्याचं सांगण्यात येत आहे, प्राण्यांना दुष्काळामुळे मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागतंय.