नवी मुंबई : बेलापूर गावात जेष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी मला मिळाली ही मोठी भाग्याची बाब आहे. आज जेष्ठ नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पण त्यांचे संरक्षण करायला घरात कोणीही नसते, त्यामुळे जेष्ठ नागरिकांवर हल्ले होण्याचा संभाव असतो असे जेष्ठ नागरिकांचे अनेक प्रश्न आहेत. त्यांना वाचा फोडण्यासाठी व त्याची सभा किंवा त्यांना भेडसावणारे प्रश्न यासाठी या जागेचा त्यांना उपयोग होईल व प्रत्येक जेष्ठ नागरिकांना कमी खर्चामध्ये आरोग्याची सेवा मिळावी यासाठी मी प्रयत्ना करणार आहे. महानगरपालिकेच्या आयुक्तांचे व अधिकार्यांचे मनापासून मी धन्यवाद देते. नवी मुंबईत प्रत्येक ठिकाणी जेष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र दिले गेले पाहिजे, त्यासाठी मी प्रयत्ना करणार यापुढे जेष्ठ नागरिकाना काही हवे असेल तर ते देण्याची माझी इच्छा आहे. तूर्तास १ वर्षाचे विरंगुळा केंद्राचे भाडे (रु.१००००/-) दहा हजार रुपये मी देणगी रूपाने देत आहे. याशिवाय १ लाख रुपयाची पुस्तके, कथा-कादंबर्या व ललित साहित्य देईन, याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन बेलापूर मतदारसंघाच्या आमदार सौ. मंदाताई विजय म्हात्रे यांनी बेलापूर येथे केले.
बेलापूर येथील जेष्ठ नागरिक संस्थेला नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे बांधण्यात आलेल्या बहुउद्देशीय इमारतीमध्ये तळमजला हॉल वापरण्यास दिला. सदर हॉल चे उद्घाटन आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचे हस्ते आज करण्यात आले. त्यावेळी त्या आपले मनोगत व्यक्त करीत होत्या. महानगरपालिकेने सर्व सुख-सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार सौ. मंदा विजय म्हात्रे यांनी पालिकेच्या अधिकार्याचे आभार मानले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय जेष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष डी.एन. चापके होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीस जेष्ठ नागरिक संस्थेचे सचिव सी.बी.लिगाडे यांनी प्रास्ताविक केले. संस्थेची स्थापना, उद्देश, आजपर्यंतचे कार्य आणि आगामी काळात संघाच्या वतीने राबविण्यात येणारे उपक्रम, कार्यक्रम यांची माहिती दिली.
कार्यक्रमात अखिल भारतीय जेष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त करून जेष्ठ नागरिक संघाच्या विविध ठिकाणी चाललेल्या कार्याची माहिती दिली.
यावेळी व्यासपीठावर व कार्यक्रमास मा. आमदार सौ. मंदा विजय म्हात्रे, नगरसेवक दीपक पवार, डी.एन.चापके, ठाणे जिल्हा भाजपचे जेष्ठ नेते श्री. मारुती भोईर, माजी नगरसेवक दिनानाथ पाटील, डॉ.राजेश पाटील, राजाराम काठाळे, सी.बी.लिगाडे, महादेव पाटील, शैलजा पाटील, गजानन म्हात्रे, रवींद्र खुले, रमेश गंधे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन मोहनलाल तेली यांनी केले. समारंभास बेलापूर गाव परिसरातील जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.