मुंबई : नेहमीच वादात असणारी राखी सावंत नेहमी चर्चेत राहण्यासाठी काही न काही प्रयत्न करत असते. नुकतंच राखीनं आपण इंद्राणी मुखर्जीची आवडती अभिनेत्री, मैत्रिण असल्याचं सांगितलं आणि चर्चेत आली.
राखी अशी अभिनेत्री आहे जिला तिच्या चित्रपटांपेक्षा वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखलं जातं. राखी सावंत नेहमीच सनी लिऑनवर हल्लाबोल करत असते.
सनी लिऑनच्या कंडोमच्या जाहिरातीमुळे देशात बलात्काराच्या घटना वाढल्या, असं सीपीआय नेते अतुल अंजन यांनी म्हटलं होतं. आता या वक्तव्यावर आता राखीही बोललीय. सनी लिऑनच्या हॉट नंबर्समुळे लोकं असा दुर्व्यवहार करण्यासाठी धजावतात, असं राखी म्हणालीय.
सनी लिऑनला भारतात काम करू देऊ नये, तिला देशातून हाकलून द्यावं. यापूर्वी राखीनं सनीला टार्गेट केलं होतं. सनी लिऑनने अंजन यांच्या वक्तव्यावर उत्तर दिलं होतं, आता राखी सावंतच्या वक्तव्यावर ती काय बोलते, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.