वाशी : नवी मुंबईचे शिल्पकार लोकनेते गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त १५ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष प्रभाग ११० आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार, दि. १५ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० यादरम्यान मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये हद्यरोग तपासणी, बाल रोग तपासणी, नेत्र रोग तपासणी, सामान्य तपासणी, स्त्री रोग तपासणी, त्वचा व गुप्त रोग तपासणी, ई.सी.जी तपासणी, अस्थिरोग व्यंगोपचार चाचणी आदींची तपासणी केली जाणार आहे.
करावे गावातील शाळा क्रं. ६ व ७ ह.भ.प कै. गोसावी कृष्णा तांडेल विद्यालयात हे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असून करावे गावाच्या ग्रामस्थांनी व सभोवतालच्या परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या शिबिरामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन नगरसेवक विनोद म्हात्रे यांनी केले आहे.