नेरूळ : कॅन्डी फ्लॉस एन्टरटेनमेंन्ट आणि सिनेमा फॅक्टरी निर्मित ‘थर’ या मराठी चित्रपटाचा मूहूर्त अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष अभिनेते मोहन जोशी, अभिनेत्री अलका कुबल यांच्या उपस्थितीत नवी मुंबई येथे पार पडला.
अभिनेते विजय पाटकर ‘क्लप’ देवून ‘थर’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. चित्रपटाचे निर्माते विलास वसंत चव्हाण निर्माता आणि कलावंत अशा दुहेरी भूमिकेत दिसणार आहेत. उमेश शांताराम पवार हे चित्रपटाचे दिग्दर्शक व लेखक आहेत. चित्रपटामध्ये प्रमुख कलावंताच्या भूमिकेत प्रमोद सुर्वे, विलास चव्हाण, पूनम विनेरकर, तेजस्विनी मुंडे, रंगराव घागरे, नयन पवार, नितीन जाधव, हरिशचंद्र भंडारे, मिनाक्षी साहीत्य, सुनिल कांबळे, योगेश पाटील, योगेश अवसरे, कबीर पवार, नितीन जाधव, राजीव पाटील, लोहमश भगत आदी मातब्बर कलावंत आपणास पहावयास मिळणार आहेत. समीर, स्वप्निल, विजय हे तीन संगीतदार चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन सांभाळणार आहेत. समीर खंडागळे आणि संदीप दांडेकर यांची गीते असून चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक जवाहर खंदारे, कला दिग्दर्शक गजाजन फुलारी, कार्यकारी निर्माता सुजित भिमराज शिंदे, संकलन कुलसिंग, छायाकंन धनजंयसिंग, मनोहर दौंड आहेत.
मराठी चित्रपटसृष्टीत ‘फुलपाखरू’च्या माध्यमातून चर्चेत आलेले विलास चव्हाण यांच्या ‘थर’ चित्रपटाबाबत आणि त्यांच्या अभिनयाबाबत मराठी प्रेक्षकांना नक्कीच उत्सूकता लागून असणार!