नवी मुंबई : नेरूळ पश्चिमेकडील सेक्टर २८ मधील श्रीगणेश सोसायटीचा गणेशोत्सव भाविकांसाठी नेहमीच श्रध्देचा विषय ठरला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील भाजी मार्केटमधील व्यापारी वर्गाचा हा गणेशोत्सव. बाजार समितीचे माजी संचालक, नवी मुंबईचे माजी उपमहापौर व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक श्री.अशोकशेठ गावडे हे या गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष असून गेली १९ वर्ष अशोकशेठ गावडे यांच्याच मार्गदर्शनाखाली श्रीगणेश सांस्कृतिक क्रिडा मंडळ गणेशोत्सव साजरा करत आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाला प्राधान्य देत शिस्तबध्दरित्या साजरा होणारा व नवसाला पावणारा अशी या गणेशोत्सवाची ख्याती आहे. नवी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने व भक्तिभावाने गणेशदर्शनाला यावे असे आवाहन अशोकशेठ गावडे यांनी केले आहे.