वाशी ः नवी मुंबई महापालिका तर्फे ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त महापालिका क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांप्रती असलेली आदराची आणि आपुलकीची भावना अभिव्यक्त करण्यासाठी १ ऑक्टोबर २०१५ रोजी वाशी मधील विष्णुदास भावे नाट्यगृहमध्ये सकाळी १० ते २ या वेळेत ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धांमध्ये नाटिका स्पर्धा (समुह/एकांकिका), वेशभूषा स्पर्धा, निबंध स्पर्धा (वृध्दत्व-दुसरे बालपण), अंताक्षरी, काव्यवाचन स्पर्धा या ज्येष्ठ नागरिकांच्या विविध कलागुणांना वाव देणार्या विविध स्पर्धांचा समावेश आहे.
ज्येष्ठ नागरिक दिन कार्यक्रमात २/१०/१९३९ ते १/१०/१९४० या कालावधीत जन्म झालेल्या ज्येष्ठ नागरिकांचा अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केल्याबद्दल महापालिकेतर्फे सत्कार करण्यात येणार आहे. तसेच वैवाहिक जीवनास सन २०१५ या वर्षात ५० वर्षे पूर्ण झालेल्या (विवाहाचा कालावधी २/१०/१९६४ ते १/१०/१९६५) सुवर्णमहोत्सवी सहजीवन जगणार्या ज्येष्ठ
नागरिक जोडप्यांचाही याप्रसंगी सत्कार केला जाणार आहे, अशी माहिती महापालिका जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे यांनी दिली.
महापालिका क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांनी या स्पर्धा सहभागासाठी आणि सत्कार समारंभासाठी २१/९/२०१५ पर्यंत महापालिका विभाग कार्यालयात किंवा उप आयुक्त, सामाजिक विकास विभाग, नवी मुंबई महापालिका, पहिला मजला, सेक्टर-११, सीबीडी-बेलापूर, नवी मुंबई याठिकाणी अर्ज दाखल करावयाचे आहेत. याबाबत अधिक माहितीसाठी ०२२-२७५६३५०५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावयाचा आहे.
महापालिका क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांनी महापालिकेतर्फे आयोजित विविध स्पर्धा आणि सत्कार कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे ावाहन महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केले आहे.