पाटणा : शिवसेना वाघ आहे आणि बिहारमध्ये जाऊन सुमारे १५० जागा लढविणार असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पाटण्यात दिली.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना सज्ज झाली आहे. १०० उमेदवार निश्चित झाले असून ५० उमेदवारांची आगामी काळात निवड करण्यात येणार आहे, असे राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
निवडणुकीसाठी आम्ही तयार असल्याचेही राऊत म्हणाले. काही दिवसांपर्वी बिहारमध्ये निवडणूक लढवणार असल्याचे शिवसेनेने जाहीर केले होते.
शिवसेनेच्या या निर्णयामुळे भाजपच्या गोटात जोरदार खळबळ माजल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिवसेना जर ताकदीने या निवडणुकीत उतरली तर त्याचा फटका भाजपला बसू शकतो. भाजप हा हिंदूत्ववादी विचारसरणीचा पक्ष आहे. त्यामुळे त्याचा हिंदू मते मिळविण्याकडे नेहमीच कल असतो. परंतु, या निवडणुकीत असदुदिदन आवेसीच्या एमआयएम पक्षानेही उडी घेतली आहे.