मुंबई : मुंबई महापालिकेने बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला, अनिल कपूर आणि जिंतेद्र यांना नोटीस पाठवली आहे. या तार्यांच्या घरात डेंग्यूच्या डासांच्या अळ्या सापडल्या आहेत. या प्रकरणी या तिघांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
तसेच दिवंगत गायक किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांच्या घरातही डेंग्यू डासाच्या अळ्या सापडल्या. त्यालाही नोटीस पाठविण्यात आली आहे. यापूर्वी अमिताभ बच्चन, शिल्पा शेट्टी यांच्या घराचेही बीएमसीने नियमित परीक्षण केले होते. पण या ठिकाणी अळ्या आढळून आल्या नाहीत.
बीएमसीला अनिल कपूरच्या बंगल्याच्या रेन शेडमध्ये, जितेंद्रच्या बंगल्याच्या चालू नसलेल्या कारंज्यात, जुहीच्या मलाडच्या बंगल्यात डेंग्यूच्या अळ्या सापडल्या. डासांची पैदास थांबविली नाही म्हणून या तिघांना नोटीस पाठवली आहे. तसेच दोषी आढळल्यास त्यांना २ हजार ते १० हजार रूपयांचा दंड होऊ शकतो.