नवी दिल्ली – प्राप्तिकर विभागाकडून उद्यापासून (सोमवार) पुढील पाच दिवस पॅन क्रमांकाचे वाटप बंद करण्यात येणार आहे. सॉफ्टवेअरमध्ये सुधारणा करावयाची असल्याने पॅन क्रमांकाचे वाटप 5 ते 9 ऑक्टोबर दरम्यान बंद राहणार आहे.
मात्र, याकाळात पर्मनंट अकाउंट नंबरसाठी (पॅन) आलेले नवीन अर्ज स्वीकारले जाणार आहे. एनएसडीएल आणि यूटीआयआयटीएसएल या अधिकृत सरकारी वेबपोर्टलवर पॅनसाठी नवीन अर्ज करता येणार आहेत. ऑनलाइन आणि ऑफलाइन अश्या दोन्ही माध्यमातून पॅनसाठी अर्ज करता येणार आहे.
प्राप्तिकर विभागाचे वाढलेले काम आणि मोठ्या प्रमाणावरील पॅन डेटाबेसमुळे सिस्टम अद्ययावत करणे गरजेचे असल्याचे प्राप्तिकर विभागाच्या वरिष्ठ अधिकार्याने सांगितले. या पाच दिवसात राहिलेले काम त्यापुढील तीन दिवसात पूर्ण केले जाणार आहे, तसेच प्राप्तिकर विभागाने पाच दिवस सेवा बंद राहणार असल्याने दिलगिरी व्यक्त केली आहे.
प्राप्तिकरासंबंधी विविध कारणांसाठी प्राप्तिकर विभागातर्फे व्यक्ती व संस्थांना 10-अंकी यूनिक क्रमांक दिला जातो, त्यालाच पॅन क्रमांक म्हटले जाते.