** रघुलीला मॉल व इनोर्बिट मॉल व्यवस्थापनाला निवेदन**
नवी मुंबई / प्रतिनिधी
नवी मुंबई वाशी येथील रघुलीला मॉल व इनोर्बिट मॉल मधील दुकाने व अस्थापानांच्या असलेल्या पाट्या 10 दिवसात मराठीत कराव्यात व या सर्व आस्थापनात स्थानिक मराठी मुलांनाच नोकरीत प्राधान्य द्यावे यासाठी मनसे रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे शहर अध्यक्ष नितीन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या शिष्टमंडळाने रघुलीला मॉल व इनोर्बिट मॉल च्या व्यवस्थापनाला निवेदन दिले
यावेळी मनसे रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष नितीन चव्हाण, शहर सचिव आप्पासाहेब कोठुळे, उपशहर अध्यक्ष स्वप्निल गाडगे, रुपेश कदम, मनसे वाशी विभाग अध्यक्ष विक्रांत मालुसरे, अभिलेश दंडवते, विभाग संघटक वाशी अनिकेत पाटील, नेरूळ तुषार कचरे, कोपरखैरणे नीरज सिंग, ऐरोली अक्षय सावंत, शाखा अध्यक्ष सागर नाईकरे, महाडिक, सागर पवार व इतर कार्यकर्त उपस्थित होते.