नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. नेरूळ गाव सेक्टर 20 येथील महापालिका शाळा क्रं.10 आणि सेक्टर 12 येथील नामदेव रामा भगत एज्युकेशनल सोशल अॅण्ड कल्चरल ट्रस्टच्याचतीने चालविण्यात येणार्या शाळा-महाविद्यालयाच्या प्रांगणात या पथनाट्याचे प्रयोग झाले. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयास या माध्यमातून करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत व माजी नगरसेविका सौ. इंदूमती भगत तसेच स्थानिक रहीवाशी व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.