* वर्क ऑर्डर न निघाल्याचे कंत्राटदार सांगतोय
* आमदार संदीप नाईकांशी साधला कामगारांनी संपर्क
नवी मुंबई : केंद्र व राज्य शासनाकडून वारंवार बक्षिसाचा वर्षाव होणार्या व ‘स्मार्ट सिटी’मध्ये तिसर्या क्रमाकांने गौरविलेल्या नवी मुंबई शहराच्या महापालिकेचा कारभार म्हणजेच ‘बडा घर अन् पोकळ वासा’ असल्याचे वारंवार स्पष्ट होत आहे. नवी मुंबईतील श्रमिक घटकांचे तारणहार म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात ओबामा या नावाने ओळखल्या जाणार्या आमदार संदीप नाईकांनी सातत्याने महापालिकेतील कामगारांच्या हिताचा विचार केला आहे. ज्या मूषक नियत्रंण कामगारांचा पगार पाच हजार रूपयांवरून दहा हजार रूपयावर गेला. आज त्या मूषक नियत्रंण कामगारांना दोन महिने पगार झाला नाही. महापालिकेत सत्ता राष्ट्रवादी कॉंग्र्रेसची आहे. उपेक्षित व त्रस्त मूषक नियत्रंण कामगारांनी पुन्हा एकवार आमदार संदीप नाईकांचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे.
मूषक नियत्रंण कामगारांना गेली काही वर्षे अवघ्या ५ हजार रूपयांवर काम करावे लागत होते. आमदार संदीप नाईकांना ही परिस्थिती समजताच त्यांनी तात्काळ महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून दहा हजार रूपये वेतन महापालिका प्रशासनाला भाग पाडले. मूषक नियत्रंण कामगारांची हलाखीची परिस्थिती असल्याने आमदार संदीप नाईक सातत्याने या कामगारांची परिस्थिती जाणून घेतात. त्यामुळे मूषक नियत्रंण कामगारांना अन्य नेत्यांच्या तुलनेत आमदार संदीप नाईक जवळचे वाटतात.
ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्याचे वेतन झालेले नाही. ऑक्टोबर महिना अर्धा संपत आला आहे. दसरा आता अवघ्या आठवड्यावर आला असून महिन्यावर दिवाळी आलेली आहे. मूषक नियत्रंण कामगार सातत्याने वेतन विलंबाबाबत ठेकेदार मणीकडे संपर्क करतात. तेव्हा वर्क ऑर्डर निघाली नसल्याने वेतन होणार नसल्याचे ठेकेदार कामगारांना सांगतात. जर वर्क ऑड्रर अजून सहा महिने निघाली नाही तर पगार होणारच नाही का, असा संतप्त सवाल मूषक नियत्रंणच्या कामगारांकडून विचारला जात आहे. बुधवारी दुपारी मूषक नियत्रंणच्या कामगारांनी आमदार संदीप नाईक यांच्यांशी संपर्क करून त्यांना आपल्या रखडलेल्या वेतनाबाबत कल्पना दिली आहे. आमदार संदीप नाईकांनीदेखील याप्रकरणी तात्काळ लक्ष घालून समस्येचे निवारण करण्याचे आश्वासन दिले आहे.