मुंबई : ख्रिसमसच्या सुट्यांमध्ये बॉलिवूडचे दोन मोठे चित्रपट एकत्र 18 डिसेंबरला रिलीज होणार आहे. एकीकडे संजय लीला भंसालींचा बाजीराव मस्तानी आणि दुसरीकडे रोहित शेट्टीचा दिलवाले.
अशी बातमी येतेय की, फिल्म रिलीजबाबत दीपिकानं शाहरूखसोबत चर्चा केली. मात्र बाजीराव मस्तानीमधील या मस्तानीला जेव्हा बॉक्स ऑफिसवर होणार्या या स्पर्धेबाबत विचारलं असता ती म्हणाली, मी शाहरूखचा खूप सन्मान करते आणि चित्रपट रिलीजच्या तारखेबाबत तिनं काहीही चर्चा करू शकत नाही.
दीपिका म्हणाली जेव्हा आपण बाजीराव मस्तानी सारखा चित्रपट करतो तेव्हा आपल्याकडे तितका वेळ नसतो की, चित्रपट रिलीजच्या तारखेबाबत चर्चा करावी आणि एक अभिनेत्री म्हणून संजय लीला भंसालींच्या दिग्दर्शनात बनलेल्या या चित्रपटात आपलं काम खूप प्रामाणिकपणे आणि दृढ निश्चयासोबत करायला हवं.
चित्रपट रिलीजच्या तारखेबाबतचा निर्णय हा दिग्दर्शक आणि निर्मात्याचा असतो. खाजगी आयुष्यात माझे शाहरूखसोबत खूप चांगले निर्णय आहे आणि अशा प्रकरणात शाहरूख कधीही बोलणार नाहीत. यापूर्वी 2007मध्ये शाहरूखचा चित्रपट ओम शांती ओमची टक्कर संजय लीला भंसालींच्या सावरियाँसोबत झाली होती आणि विशेष म्हणजे दीपिकानं त्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. ऐतिहासिक चित्रपट बाजीराव-मस्तानीमध्ये दीपिका सोबत रणवीर सिंह बाजीराव पेशव्याच्या आणि प्रियंका चोप्रा बाजीरावची पहिली पत्नी काशीबाईच्या भूमिकेत दिसणार आहे. तर दिलवालेमधून शाहरूख-काजोलची जोडी पुन्हा एकत्र दिसणार आहे.