वाशी / वार्ताहर
नवी मुंबईतील धडाकेबाज मनसे कार्यकर्त्यांनी मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई, तुर्भे एमआयडीसी डी42 येथील करोडो रुपयांचा अवैध डाळीचा साठा पकडून दिला
या वेळी रेशनिंग अधिकारी दीपेंद्र परुलेकर, कोळी, जोशी व् मनसे चे महेश जाधव, वाहतूक सचिव सुधीर नवले रोजगार विभाग सचिव आप्पासाहेब कोठुळे, विभाग अध्यक्ष नितिन खानविलकर, विनय कांबळे, उपविभाग अध्यक्ष राजेश ढवळे, नीलेश सैदाने, सागर नाइकरे, उपशहर अध्यक्ष मनविसे सनप्रीत तुर्मेकर, संदेश डोंगरे, अनिकेत पाटील, तुषार जाधव, शिवम कवडे व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
विधानसभा व त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणूकीनंतर बर्याच काळानंतर मनसेची मुलुखमैदानी तोफ असणारे आंदोलनात्मक व चळवळ्या गजानन काळे पुन्हा एकवार त्यांच्या वृत्तीला साजेसे कार्य करू लागल्याने आगामी काळात गजाननास्त्र अनेकांना लवकरच लक्ष्य करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.