नवी मुंबई : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानांतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील 10 शहरांमध्ये निवड होऊन देशातल्या 98 शहरांमध्ये नवी मुंबईचा समावेश असून दुसर्या टप्प्यात देशातील 10 शहरांमध्येही नवी मुंबईचा समावेश असावा यादृष्टीने आपण सकारात्मक पाऊले उचलत असून यामध्ये लोकसहभागाला विशेष महत्व दिले जात आहे. त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी-कर्मचार्यांच्या नवी मुंबई शहराविषयीच्या वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनांचा विचार व्हावा यादृष्टीने महापालिका मुख्यालयातील काही विभागांच्या अधिकारी-कर्मचारीवृंदाशी आज महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मुख्यालयातील ज्ञानकेंद्र सभागृहात सुसंवाद साधला. नवी मुंबई शहराला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी आपण सर्वांनी सांघिक भावनेने काम करुया असे आवाहन करीत सर्व लोकप्रतिनिधी आणि शहरातील नागरिक यांच्या एकत्रित सहभागाने आधुनिक म्हणून ओळखले जाणारे नवी मुंबई शहर नक्कीच स्मार्ट सिटी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शहर अभियंता मोहन डगांवकर यांनी प्रेझेन्टेन्शव्दारे स्मार्ट सिटी संकल्पना व अपेक्षा याविषयी विस्तृत माहिती दिली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, उपआयुक्त अमरिश पटनिगीरे, उपआयुक्त उमेश वाघ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड, सहा. संचालक नगररचना सुनिल हजारे, कर निर्धारक व संकलक प्रकाश कुलकर्णी, वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. दिपक परोपकारी, अतिरिक्त शहर अभियंता सुरेंद्र पाटील, सह शहर अभियंता जी.व्ही.राव, इ.टी.सी. केंद्र संचालक डॉ. वर्षा भगत, कार्यकारी अभियंता संजय देसाई, अरविंद शिंदे, अनिल नेरपगार, शंकर पवार तसेच अनेक अधिकारी-कर्मचारी यांनी स्मार्ट शहराविषयीच्या आपल्या सूचना मांडल्या. अशाचप्रकारची सुसंवाद सत्रे इतर विभागांच्या अधिकारी-कर्मचारीवृंदासोबत आयोजित करण्यात येत आहेत.
स्मार्ट सिटी विषयीची कार्यप्रणाली राबविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात स्मार्ट सिटी – वॉर रूम सुरु करण्यात आली असून नागरिकांच्या सूचना, संकल्पनांना महत्व देण्यात येत आहे. याकरीता भारत सरकारच्या http://mygov.in/home/discuss किंवाhttp://mygov.in/group-issue/
सध्याचा सोशल मिडीयाची लोकप्रियता लक्षात घेऊन फेसबुक व ट्विटर सारखी समाजमाध्यमे उपलब्ध करुन देण्यात आली असून नागरिक स्मार्ट शहराविषयीच्या आपल्या संकल्पना https://www.facebook.com/
त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध वसाहती, सोसायट्या, दुकाने, उद्योगसमुह, सर्व्हिस इंडस्ट्रीज, शाळा, महाविद्यालये, सेवाभावी संस्था, मंडळे अशा विविध ठिकाणी पोहचून नागरिकांच्या स्मार्ट सिटी बाबतच्या संकल्पना मोठ्या प्रमाणावर लिखित स्वरुपात जाणून घेतल्या जात आहेत. नागरिकांनी आपल्या संकल्पनेतील स्मार्ट शहर व त्यामध्ये त्यांना आवश्यक असणा-या गोष्टी मांडाव्यात याकरीता निबंध व चित्रकला अशा स्पर्धांचेही विद्यार्थी पातळीवर तसेच कोणताही नागरिक सहभाग घेऊ शकेल अशा खुल्या पातळीवर आयोजन करण्यात येत आहे.
तरी आपले नवी मुंबई शहर स्मार्ट सिटी बनविण्यासाठी शहरातील प्रत्येक नागरिकाने आपणहून सहभागी व्हावे व आपल्या मौल्यवान सूचना कराव्यात याकरीता महापालिका कार्यालयात उपलब्ध असलेले लेखी सूचनापत्र भरून आणि इंटरनेट फ्रेंडली नागरिकांनी mygov.inया वेबसाईटवरdiscuss forum मध्ये जाऊन तसेच फेसबुक, ट्विटर अशा सोशल मिडियाचा वापर करणा-या नागरिकांनी त्यावरुन आपल्या स्मार्ट सिटीविषयीच्या संकल्पना मांडाव्यात तसेच आपल्या परिचयाच्या नागरिकांनाही सांगावे असे आवाहन महापौर सुधाकर सोनवणे व महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या वतीने करण्यात येत आहे.