सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा रविवार, दि. 25 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला असून नवी मुंबईचे शिल्पकार लोकनेते गणेश नाईक हे मार्गदर्शन करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना गणेश नाईक काय मार्गदर्शन करतात, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहीले आहे.
लोकनेते गणेश नाईक यांना उभा महाराष्ट्र नवी मुंबईचे शिल्पकार याच नावाने संबोधत असले तरी त्यांचे सुरूवातीचे कार्यकर्ते व जुनजाणते नवी मुंबईकर आजही त्यांना दादा याच नावाने संबोधतात. 1980 पासून नवी मुंबईचे राजकारण गणेश नाईक याच नावाभोवती गुंफलेले पहावयास मिळत आहे. फिनिक्स पक्षी व लोकनेते गणेश नाईक यांचा जवळचा संबंध असल्याचे नेहमीच आदरपूर्वक बोलले जाते. फिनिक्स पक्षी हा राखेतूनही भरारी मारतो. ज्या ज्या वेळी राजकारणात गणेश नाईक संपल्याची आवई उठविली जाते, त्यावेळी गणेश नाईकांनी प्रत्यक्ष मतपेटीतून आपल्या पाठीशी असलेल्या जनाधाराच्या माध्यमातून या प्रकाराला चोख उत्तर दिलेले आहे.
1999 साली विधानसभा निवडणूकीत गणेश नाईकांचा घडवून आणलेल्या पराभवाला 2004 साली उत्तर देण्यात आले होते. 2014 साली मोदी लाटेमुळे अवघ्या 1400 मतांनी लोकनेते गणेश नाईकांचा पराभव झाला. अनेकांनी राजकीय सोय म्हणून शिवसेना-भाजपामध्ये प्रवेश केला. महापालिका निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पानिपत होणार यावर पैजाही लागल्या होत्या. पण नवी मुंबईकरांनी पुन्हा एकवार लोकनेते गणेश नाईकांच्या नेतृत्वावर, लोकहितैषी ध्येयधोरणांवर विश्वास दाखवित महापालिका निवडणूकीच्या माध्यमातून नवी मुंबईचा कारभार पुन्हा लोकनेते गणेश नाईकांच्या स्वाधीन केला.
गणेश नाईकांच्या मार्गदर्शनरूपी भाषणाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना नेहमीच संजीवनी प्राप्त झालेली आहे. आपल्या भाषणातून लोकनेते गणेश नाईकांनी कार्यकर्त्यांना नेहमीच सकारात्मकतेवर भर देत पक्षसंघटना जनताभिमुख करण्याचा सल्ला आजवर दिलेला आहे. रविवारी, दि. 25 ऑक्टोबर रोजी होणार्या कार्यकर्ता मेळाव्यात लोकनेते गणेश नाईकांच्या मार्गदर्शनाची कार्यकर्त्यांना उत्सूकता लागून राहीली आहे.