रामेश्वरम : समुद्र सीमेचे उल्लंघन करुन श्रीलंकेच्या अंतर्गत भागात मासेमारी केल्याच्या आरोपावरुन श्रीलंकन नौदलाने मंगळवारी तामिळनाडूच्या ३४ मच्छीमारांना अटक केली आहे.
अटक केलेल्या मच्छीमारांपैकी २३ मच्छीमार पुडूकोट्टाय जिल्ह्यातील कोट्टायपट्टीनम गावातील आहेत. नेडूनथीवूच्या समुद्रातून त्यांना अटक केली. अन्य ११ मच्छीमारांना काटचाथीवूच्या समुद्रातून अटक केली.
मासेमारीची ४० जाळी आणि दोन बोटींचे श्रीलंकन नौदलाने नुकसान केले. सात बोटी श्रीलंकन नौदलाने जप्त केल्या आहेत. श्रीलंकन नौदल याच आठवडयात आपल्या ताब्यातील काही भारतीय मच्छीमारांची सुटका करणार असताना पुन्हा भारतीय मच्छीमारांना अटक झाली आहे. समुद्र सीमेच्या उल्लंघनाच्या आरोपावरुन श्रीलंकन नौदलाने आतापर्यंत अनेकदा भारतीय मच्छीमारांना अटक केली आहे.