नवी मुंबई : नवी मुंबई हे आधुनिक, शांत व आनंददायी शहर असून मला नवी मुंबईत रहायला आवडते असे सांगत सुप्रसिध्द संगीतकार-गायक शंकर महादेवन यांनी नवी मुंबई शहराची निवड स्मार्ट सिटीत झाल्याचा अभिमान वाटतो असे मत व्यक्त केले. आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील स्मार्ट सिटी वॉर रुमला भेट देऊन त्यांनी महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याशी चर्चा करत स्मार्ट सिटी बाबत विविध मौल्यवान सूचना केल्या.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग नागरिकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी केला जाऊन यामधून नागरिकांचे जीवनमान उंचाविणे म्हणजे स्मार्ट सिटी बनविणे अशी स्मार्ट सिटीची अभिनव संकल्पना मांडत श्री. शंकर महादेवन यांनी माणसाच्या दैनंदिन सेवासुविधांच्या गरजांप्रमाणेच सांस्कृतिक, शैक्षणिक, सुरक्षा, प्रवासी सेवा अशा अनेक गरजा असतात. त्या पूर्ण करण्यासाठी विविध प्लिकेशन्सचा वापर करणे यापुढील काळात गरजेचे असून यामधूनच नवी मुंबई सिटी स्मार्ट बनेल असे सांगितले. नवी मुंबईचा नागरिक म्हणून मी स्वत: यात आनंदाने यात सहभागी होईन व माझे संपूर्ण योगदान देईल असे शंकर महादेवन यांनी प्रतिपादन केले. आम्ही कलावंत मंडळी सृजनशील असतो. कल्पना हा आमच्या कलानिर्मितीचा पाया असतो. त्यामधूनच गाणे बनते, चित्र तयार होते. त्यामुळे शहराविषयीच्या माझ्या काही संकल्पना महापालिका आयुक्त यांच्यापुढे मांडल्या आहेत. त्यांचा निश्चित उपयोग शहराच्या स्मार्ट निर्मितीसाठी होईल असा विश्वास शंकर महादेवन यांनी व्यक्त करीत याकामी संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी श्री. शंकर महादेवन यांच्यासारखे जगप्रसिध्द व्यक्तिमत्व नवी मुंबईचे नागरिक आहेत व त्यांचे शहरावर अतिशय प्रेम आहे ही आपल्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट असल्याचे सांगत आज त्यांनी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयालातील स्मार्ट सिटी वॉर रुमला भेट देऊन नवी मुंबई स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने अभिनव संकल्पना मांडल्या. जगाच्या पाठीवर विविध देशांमध्ये ते जात असल्याने तेथील काही चांगल्या गोष्टी सहजपणे नवी मुंबईत आणणे शक्य आहे अशा संकल्पना त्यांनी मांडल्या असून लवकरच ते त्याबाबतचे पॉवरपॉईंट प्रेझेन्टेशन देखील देणार असल्याचे सांगत महापालिका आयुक्तांनी अशाप्रकारे श्री. शंकर महादेवन यांच्यासारखे लोकप्रिय व्यक्तिमत्व शहरासाठी आपला वेळ देते, संकल्पना मांडते त्यावेळी निश्चितच स्मार्ट सिटीच्या दिशेने अधिक गतीमान वाटचाल होते असे स्पष्ट केले.
सुप्रसिध्द संगीतकार-गायक श्री. शंकर महादेवन यांच्याप्रमाणेच प्रत्येक नागरिकाने नवी मुंबई शहराविषयीच्या आपल्या संकल्पना-सूचना http://mygov.in/home/discuss किंवाhttp://mygov.in/group-issue/