मुंबई: तब्बल दोन दशकं पोलिसांना गुंगारा देणारा छोटा राजनला अटक झाल्यानं आता त्याच्या गॅँगचा म्होरक्या कोण होणार यावर गुन्हेगारी विश्वात जोरदार चर्चा रंगतेय. गँगमध्ये आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी चढाओढीमुळे पुन्हा एकदा गँगवॉर भडकण्याचीही शक्यताही या निमित्तानं वर्तवण्यात येतेय.
राजन गँगमधले तिघे जण छोटा राजनचे तीन साथीदार संतोष उर्फ अबू सावंत, विक्की मल्होत्रा आणि डी के राव हे गँगचा पसारा आपल्या हाती घेण्यासाठी उत्सुक असल्याचं बोललं जातयं. राजनच्या नावानं संपूर्ण देशात कोट्यवधींचा खंडणीचे व्यवहार चालतात. शिवाय अमली पदार्थांच्या तस्करीतूनही राजननं बराच पैसा जमा केलाय.
त्यामुळे त्याच्या या काळाधंद्यांचा वारसा पुढे कुणी चालवायचा यावरून आता युद्ध होण्याची चिन्हं आहेत. दरम्यान, पोलिस सूत्रांनी डीएनएला दिलेल्या माहितीनुसार अबू सावंत हाच गँगचा म्होरक्या बनण्याची शक्यता आहे.