नवी दिल्ली – बिहारमधील निवडणुकीतील अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या तिसर्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख व दिल्ली राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील मतदारांना नितीशकुमार यांना पुन्हा निवडून देण्याचे आवाहन आज (मंगळवार) केले. केजरीवाल यांनी ट्विटच्या माध्यमामधून हे आवाहन केले आहे.
तृणमूल कॉंग्रेस पक्षाच्या प्रमुख व पश्चिम बंगाल राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही काही दिवसांपूर्वी देशाची गरज ओळखून, व बिहारच्या विकासाकरता‘‘ संयुक्त जनता दलाचे प्रमुख व राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना निवडून द्यावे, असे आवाहन केले होते.
या निवडणुकीसाठी केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्षाविरोधात लढणार्या नितीश कुमार यांना पाठिंबा जाहीर केला आहे. नितीशजींना बिहारच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा बसवा, असे बिहारच्या बंधु भगिनींना माझे आवाहन आहे,‘‘ असे ट्विट केजरीवाल यांनी केले आहे.