नवी मुंबई : स्मार्ट सिटी अभियानांतर्गत आपले नवी मुंबई शहर महाराष्ट्र राज्यातील १० शहरांमध्ये निवडले गेले असून दुसर्या टप्प्यात केंद्र सरकारमार्फत निवडल्या जाणार्या १० शहरांमध्ये नवी मुंबईचा समावेश असावा याकरीता सर्व स्तरांतून प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये नवी मुंबईतील प्रत्येक नागरिकाच्या अमूल्य सूचना विचारात घेतल्या जात असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी-कर्मचारी यांच्याही आपल्या शहराविषयी असलेल्या संकल्पनांचा विचार करण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त श्री. दिनेश वाघमारे यांनी आज दुसर्या चर्चासत्रात उपकर/एल.बी.टी. समाजविकास, परिवहन, शिक्षण विभागाच्या अधिकारी-कर्मचारीवृंदाशी सुसंवाद साधला.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सेवा डॉ. संजय पत्तीवार, शहर अभियंता मोहन डगांवकर, उप आयुक्त सौ. तृप्ती सांडभोर, उपआयुक्त सुरेश पाटील, परिवहन व्यवस्थापक शिरीष आरदवाड, परिवहन विभाग मुख्य लेखा व वित्त अधिकारी जयवंत दळवी, कार्यकारी अभियंता संजय देसाई, सहा. आयुक्त दत्तात्रय नागरे व सौ. संध्या अंबादे तसेच इतर अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवी मुंबई हे अत्याधुनिक प्रकल्पांमुळे स्मार्ट सिटीच्या दिशेने गतीमान वाटचाल करणारे शहर असून आपल्या शहराला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी नागरिकांच्या अपेक्षा व आकांक्षा यांना प्राधान्य दिले जात आहे असे स्पष्ट करीत महापालिका आयुक्त श्री. दिनेश वाघमारे यांनी नवी मुंबईतील प्रत्येक नागरिकाने लिखीत सूचना पत्रे भरून अथवा भारत सरकारच्या http://mygov.in/home/discuss किंवा http://mygov.in/group-issue/
सोशल मिडीयाचा वापर करणा-या नागरिकांनी आपल्या संकल्पना https://www.facebook.com/
तरी आपले नवी मुंबई शहर स्मार्ट सिटी बनविण्यासाठी शहरातील प्रत्येक नागरिकाने यामध्ये मौल्यवान सूचना देऊन सहभागी व्हावे असे आवाहन महापौर सुधाकर सोनवणे व महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या वतीने करण्यात येत आहे.