नवी मुंबई : स्मार्ट सिटी होण्याकरीता शहराची प्रत्येक नागरिकाच्या संकल्पना विचारात घेतल्या जात असून आपल्या स्वप्नातील शहर कसे असावे याकरीता नागरिकांनी आपल्या मौल्यवान सूचना कराव्यात असे आवाहन करीत महापौर सुधाकर सोनवणे यांनी संपूर्ण नवी मुंबई क्षेत्रातील शाळा, महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी आपल्या शाळांतील शिक्षक, विद्यार्थी व पालकांना याचे महत्व सांगावे असे आवाहन केले. स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांशी सुसंवादात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून नेरुळ येथे महापालिका क्षेत्रातील शाळा, महाविद्यालयांच्या प्राचार्य, मुख्याध्यापकांशी संवाद साधताना ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आपल्या मनोगतात स्मार्ट सिटी निर्मिती प्रक्रीयेत प्रत्येक नागरिकाच्या मताचे महत्व विषद करीत विद्यार्थ्यांमार्फत त्यांच्या पालकांपर्यंत ही संकल्पना पोहचविण्याचे आवाहन केले. याकरीता विद्यार्थ्यांना स्मार्ट सिटी सूचना पत्रे उपलब्ध करुन दिली जाणार असून याशिवाय नागरिकांनी http://mygov.in/ home/ discuss किंवा http://mygov.in/group-issue/
शहर अभियंता मोहन डगांवकर यांनी स्मार्ट सिटी विषयी प्रेझेन्टेशनव्दारे माहिती देत प्रत्येक नागरिकाने नवी मुंबई शहराविषयी असलेल्या आपल्या संकल्पना उत्स्फुर्तपणे मांडाव्यात असे सांगितले. शिक्षण विभागाचे उपआयुक्त अंबरिश पटनिगिरे यांनी सर्व प्राचार्यांना आपल्या शिक्षक व विद्यार्थ्यांमार्फत पालक यांच्यापर्यंत स्मार्ट सिटी संकल्पना पोहचविण्याचे आवाहन केले. नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत स्मार्ट सिटी विषयी जनजागृती करण्याकरीता लवकरच विद्यार्थ्यांची भव्यतम रॅली आयोजित करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. महापौर सुधाकर सोनवणे व महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी या रॅलीमध्ये अधिकाधिक विद्यार्थी एकात्म भावनेने सहभागी होतील यासाठी सर्व शाळा, महाविद्यालयांनी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन केले. अशाप्रकारचे स्मार्ट सिटी विषयी सुसंवादात्मक कार्यक्रम विविध स्तरांवर आयोजित करण्यात येत आहेत.