नवी मुंबई : केंद्रात व राज्यात युती सरकारचे राज्य आल्यापासुन महागाई ही अधिकच वाढलेली आहे. नागरिकांना दररोजच्या आहारासाठी लागणारे अत्यावष्यक खादय, अन्नधान्ये, कडधान्ये यांच्या किंमती या २०० रूपये प्रतिकिलोपर्यंत गेलेल्या आहेत. याची झळ जनतेला बसत असुन आगामी काळात कायम दर नियंत्रणात आणण्यासाठी व ऐन सणासुदीच्या काळात महागाई कमी करणेबाबतच्या मागणीसाठी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस पक्षातर्फे मंगळवारी सायंकाळी ठिक ६ ते ७ वाजेपर्यंत कोपरखैरणे येथील सेक्टर १५-१६ च्या भाजी मार्केट परिसरात दैनंदिन बाजारहाटीसाठी आलेल्या नागरिकांना महागाई विषयक निषेध व्यक्त करणारी माहिती पत्रके पथनाटयाद्वारे व निशेध फेरी काढून वाटण्यात आली.
या वेळी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष दशरथ भगत यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील आणि राज्यातील भाजपा युती सरकारचा थापाड्या कारभाराविषयी व महागाई विषयक आलेल्या परिस्थितीला तोंड देण्यात अपयशी ठरणार्या मुद्यांवर प्रहार करणारी चौक सभा घेण्यात आली. या जनजागृतीपर निषेध कार्यक्रमाच्या वेळी जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सुरेश नायडू, इकबाल कवारे, आरोग्य समिती सभापती पुनम पाटील, कॉंग्रेस पक्ष प्रतोद अंजली वाळुंज, नगरसेविका वैजयंती भगत, मीरा पाटील, जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या सुदर्शना कौशिक, प्रकाश थळी, संजय यादव, निजाम अली शेख, त्रियोगी तिवारी, जमीर षेख, पुजा जैन, इरफान पटेल, पुजा धोत्रे, संजय पाटील, बलराज जोषी, राजेश पाटील, बाळकृष्ण बैले, रामचंद्र ठाकुर, सुवर्णा पाटील, संतोश सुतार, महादु थोरात, सचिन शिंदे, एस. गुरूमुर्ती, धनराज यादव, युसूफ पटेल, जगन्नाथ गोळे, दिपीका शिंदे, नरेंद्र हडकर, निलेष षर्मा या सह युवक कॉंग्रेस व एन.एस.यु.आय. चे पदाधिकारी उपस्थित होते. महागाई विशयक लक्ष वेधून घेणारे पथनाटय जिल्हा कॉंग्रेसचे पदाधिकारी इकबाल कवारे व निजाम अली शेख सादर केले. त्यास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.