श्रीकांत पिंगळे
नवी मुंबई : प्रभाग क्रं ९६ व ९७च्या वतीने दिवाळीनिमित्त स्वस्त दरात फराळ साहीत्याचे वाटप ६ ते ८ नोव्हेंबर या तीन दिवसाच्या कालावधीत आयोजित करण्यात आले असल्याची माहिती शिवसेना नगरसेवक काशिनाथ पवार यांनी दिली.
साखर, रवा, चना डाळ, मैदा, डालडा या पाच पदार्थांचे सांयकाळी ६ ते ९ या वेळेत सागर दर्शन टॉवर येथील शिवसेना शाखेत स्वस्त दरात वितरण केले जाणार आहे. शिवराज प्रतिष्ठानच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून विभागातील नागरिकांना याचा लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेवक काशिनाथ पवार यांनी केले आहे.