नवी दिल्ली : जागतिक बाजारातील मंदी आणि सराफा बाजारातून मागणीत घट झाल्याने सलग सहाव्या दिवशी सोने दरात घसरण झालेली पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्यातील हा सर्वात निच्चांक आहे. राजधानी दिल्लीत आज २७० रुपयांनी सोने दर खाली आला.
सोने प्रति तोळा २६,४३० रुपये होते. सराफा बाजारातून सोने मागणीत घट झालेय. तसेच सोने नाणी व्यापार्यांकडूनही अपेक्षित उठाव न झाल्याने दिवाळीच्या तोंडावर सोने दरात घसरण पाहायला मिळत आहे. तसेच चांदी दरातही घट पाहायला मिळाली. चांदी १८० रुपयांनी स्वस्त झाली. सोन्याचा किलोचा दर ३६,०७० रुपये होता.
सोने बाजारात जी घसरण होत आहे त्याला जागतिक बाजारपेठेतील मंदी असल्याचे सांगण्यात येत आहे. जागतिक बाजार थंड आहे. अमेरिकन केंद्रीय बँकेच्या मागिल बैठकीत फेडरल बँकेचे प्रमुख यांनी व्याज दरात वाढ करण्याची घोषणा केली. त्यामुळे अमेरिकेत बँक दरवाढ होण्याच्या भीतीने सोन्याचा उठाव झाला नाही. त्यामुळे सोने दरात घट झाल्याचे म्हटले जातेय.
जागतिक स्तरावर न्यूयॉर्कमध्ये काल सोने बाजारात घट झालेली पाहायला मिळाली. सोने दरात १.४३ टक्के घट झाली. त्यामुळे सोने १,११७.२० डॉलर प्रति औंस राहिले. तर चांदीचा दर ०.९७ टक्क्यांनी घट होऊन १५.२६ डॉलर प्रति औंस होता.
राजधानीत सोने ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्ध सोनेची किंमत २७०-२७० रुपये घसरण झाली. अनुक्रमे सोने दर २६,४३० आणि २६,२८० रुपये प्रति तोळा बाजार बंद झाला त्यावेळी होता.