नवी मुंबई जनसामान्यांमध्ये मिसळणारा आणि शांत,संयमी मितभाषी असा धनीराम विष्णू मढवी यांच्या सारखा समाजसेवक हरपला असून सानपाडा विभागामध्ये मोठी शोककळा पसरली आहे. त्यामुळे त्यांची पोकळी सहजासहजी भरून निघण्यासारखी नसून आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी सदैव उभे असल्याचे प्रतिपादन ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व नवी मुंबईचे शिल्पकार लोकनेते गणेश नाईक यांनी व्यक्त केला.
बुधवारी, दि. ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.१५ च्या जवळपास सानपाडा गावचे सुपुत्र व समाजसेवक धनीराम विष्णू मढवी यांचे सानपाडा सेक्टर ६ येथील ‘न्यू वे’ या रुग्णालयात हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले. मृत्यूसमयी धनीराम मढवी यांचे वय ६८ वर्ष होते. बुधवारी दुपारी १२.३० वाजता सानपाडा सेक्टर ५ येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, २ मुली असा परिवार आहे. शुक्रवार दि. ६ नोव्हेबर या दिवशी धनीराम माधवी यांच्या राहत्या घरी सकाळी १० वाजता होमविधी होणार आहे. फायझर कंपनीमध्ये कार्यरत असताना धनीराम मढवी यांनी अनेक कामगारांना न्याय मिळवून दिला होता. सानपाडा विभागातील नागरिकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे व मैत्रीचे चांगले संबंध होते. ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांचे ते एकेकाळचे जवळचे जुने सहकारी होते. याप्रसंगी ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व लोकनेते गणेश नाईक,नवी मुंबईचे युवा नेते वैभव नाईक, माजी महापौर सागर नाईक, महापालिका सभागृह नेते जयवंत सुतार, नगरसेवक लक्ष्मीकांत पाटील, माजी नगरसेवक शंकर माटे, माजी नगरसेवक दिलीप बोर्हाडे, माजी नगरसेवक बाळाराम पाटील, माजी नगरसेवक केशव म्हात्रे, ठाणे युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष निशांत भगत, नवी मुंबई व्यापारी व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष व सानपाडा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विवेक भालेराव, सानपाडा गावचे माजी सरपंच रामा बामा मढवी, भारतीय जनता पार्टीचे महेश मढवी, शिवसेनेचे विभागप्रमुख मिलिंद सूर्यराव, उपविभागप्रमुख रामचंद्र पाटील, महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेचे नवी मुंबई उपशहर अध्यक्ष गणेश पावगे, घन;श्याम पाटे, राष्ट्रवादी कॉंग्र्रेसचे दिगंबर पाटील, जगदीश पाटील, मोहन पन्हाळकर, वैशाली पन्हाळकर, श्रीकांत चव्हाण, रविराज गव्हाणे, सुनिल चव्हाण, दत्ता पाटील, साईनाथ मढवी, वृषाली चव्हाण, मंदाकिनी कुंजीर, राजश्री कमळे, सुनिल शिंदे, नवनाथ पोळ, जगन्नाथ जगताप तसेच सानपाडा विभागातील सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते,रहिवाशी व व्यापारी उपस्थित होते.