नवी मुंबई : महाराष्टातील लोकशाहिरी चा वारसा जपून ठेवणार्या लोककलावंत म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर विठ्ठल उमप, वामनदादा कर्डक, शाहीर साबळे यांच्या लोकशाहिरीला उजाळा देण्यासाठी नवी मुंबई रिपब्लिकन सेनेच्या वतीने वारसा असा लाभला या कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रीब्प्लीकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर उपस्थित होते.
महाराष्ट्रातील लोकशाहिरीचा वारसा हा जपून ठेवणारे लोकशाहीर हेच खरे महाराष्ट्राचे मोती आहेत. लोकशाहीर हे खरे समाजाचे मौल्यवान हिरे आहेत. सर्वच क्षेत्रात बहुजन समाज हा आघाडीवर आहे. लोकशाहीराणी कधीही असा विचार केला नाही कि समजाने आपल्याला काय दिले ,मात्र उलट समाजाने काय दिले याचा विचार न करता आपण समाजाला काय देणार असा विचार करणारे म्हणजे लोकशाहीर आसल्याचे प्रतिपादन रीप्बलीकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी केले. यावेळी आंबेडकर यांच्या हस्ते रिपब्लिकन व्यापारी सेनेच्या पदाधिकार्यांना व्यापारी परवान्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय शाहीर परिषदेचे रमेश कदम, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहसचिव भीमराव कमिटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन नवी मुंबई रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष खाजामिया पटेल यांनी केले होते. महाराष्ट्रातील लोकशाहिरी चा वारसा जपून ठेवणार्याच्या सदाबहार गाणी, गवळण,पौवडा डे, भीम गीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . रिपब्लिकन सेनेचे अशोक जगदाळे, प्रकाश बनसोडे ,आकाश डोंगरे आदि उपस्थित होते.